जुडवा २ चित्रपटात डबल रोल साकारल्यानंतर आता वरुण धवन पुन्हा एकदा एक आव्हानात्मक भूमिका साकारायला सज्ज झाला आहे. वरुणच्या सुई धागा या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला असून त्यात वरुण शिवणकाम करताना दिसत आहे.
वरुण ने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुव सुई धागाचा फर्स्ट लूक रिलीज शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने “हाथ-पैर का मेल गुरु, सुई-धागे का खेल शुरू!” अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोत वरूणने काळ्या रंगाचे साधे शर्ट घातले असून तो जुन्या पद्धतीच्या शिलाई मशीनवर शिवणकाम करत असल्याचे दिसत आहेत. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटात वरुण धवन सोबत अनुष्का शर्मा-कोहली सुद्धा दिसणार आहे. अनुष्का ने वरुणला टॅग करत “आगे आगे मौजी भैया, पीछे पीछे पूँछ,बढ़ते जाएँ मौजी भैया, घटती जाए पूँछ।बोलो क्या?” हे कोडं टाकलं होतं. त्यावर वरुणने “सुई धागा” असे उत्तर दिले होते. त्यावर अनुष्काने “सौ बटे सौ! चलो अब पिक्चर बनाते हैं साथ में – मज़ा आएगा ”असे उत्तर दिले होते
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews